2 Jahre - übersetzen

चिंतामणी दर्शन !
आज कळंब येथील अष्टविनायकांपैकी एक असलेले चिंतामणी गणपती चे दर्शन घेतले व शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व जनसामान्यांच्या आयुष्यात येणारे विध्न, चिंता दूर करून सतत उन्नत प्रगत होवू दे, अशी प्रार्थना बाप्पा चरणी केली.
ऋग्वेदकाळात कळंब हे गाव भदंबपूर या नावाने प्रसिद्ध होते. कळंब येथील मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. ३५ फूट खोल कुंडामध्ये हा गणपती आहे. ही गणपतीची मूर्ती दक्षिणमुखी आहे. इंद्राने गौतमऋषींच्या शापातून मुक्त होण्यासाठी इथे गणपतीची तपश्चर्या केली अशी आख्यायिका इथे प्रचलित आहे.

image