2 yıl - çevirmek

समता सैनिक दल हीच तरुणांची खरी ओळख झाली पाहिजे.
दलित बनू नका सैनिक बना...
बाबासाहेबांनी आपल्याला स्वयं सेवक बनवले नाही तर लष्करी प्रशिक्षण देवून एक प्रशिक्षित सैनिक घडवले आहे. आज आम्हाला देखील ह्याच वर्दित आपली पिढी घडवण्याची संधी आहे. पँथर बनून गळ्यात नीले मफलर बंधण्यापेक्षा ती मानसिक गुलामी सोडून एका सैनिकासारखे प्रशिक्षित व्हा.
भविष्यातील धोके ओळखून आज च आपली ताकद बनवा अन्यथा संकटकाळी हतबल होण्यापेक्षा आताच तयारीत राहू या.
आयुष्यात ठरवलेलं ध्येय लेणी संवर्धनातून धम्म संवर्धन ह्या धम्म कार्यात एक सैनिक म्हणून ह्या चळवळीचे संरक्षक संवर्धक म्हणून आता उभे आहोत. काळाच्या ओघात झालेले प्रत्येक बदल चांगले वाईट दोन्ही पद्धतीने स्वीकारून स्वताला सिद्ध करण्यासाठी नाही तर चळवळीला मोठे करण्यासाठी ही वर्दी अंगावर आहे.
आजवर चां हा प्रवास निश्चित भविष्यातील घडामोडी साठी प्रेरणादायी आहे. चळवळीसाठी संघर्ष आणि संघर्षासाठी चळवळ अशी व्याख्या असतेच पण धम्मासाठी चळवळ आणि चळवळीसाठी धम्म किती गरजेचं आहे हे आम्ही सांगतो आहोत. जोपर्यंत ही मानसिकता रुजणार नाही तो पर्यंत आमचा इतिहास टिकणार नाही.
इतिहासाचे संवर्धन नवा इतिहास घडवण्यासाठी च आहे.
चला आपण पण या चळवळीचे पाईक होवू बाबासाहेबांच्या समता सैनिक दलाचे सैनिक होवू उद्याच्या पिढीचे आपणच मार्गदर्शक होवू....
धन्यवाद.

image