2 ans - Traduire

कार्यतत्परता जीवन व्हावे....
काल रात्री उशीरा वांजरी येथे भीषण आग लागली असता अग्निशमन दलासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मला सदर घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्यासाठी मदत केली.
विजेच्या ताराच्या स्पार्किंगमुळे एका गोठ्याला आग लागली होती. यामध्ये शेतकऱ्यांच्या हाती आलेला कापूस जळला, गुरांचे खाद्य असलेले कुटार, शेतीपूरक व्यवसायातील कुक्कुटपालन त्याचबरोबर अन्य शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. दुर्घटनेमध्ये शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.
प्रसंगी अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांना तेथील रहिवाशांना आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या सूचना दिल्या. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसून परिसरातील रहिवासी लोकांचे आतोनात नुकसान झाले. संकटसमयी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीरपणे उभे राहते, याचा अनुभव पुन्हा काल झालेल्या प्रसंगामुळे स्थानिकांना आला.

image