2 años - Traducciones

रक्षाबंधन पवित्र नात्याचा ऋणानुबंध.!
वणी विधानसभा क्षेत्रातील महिला भगिनी गेली अनेक वर्षे न चुकता रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करत असतात. यावर्षी देखील वणीतील वसंत जिनिंग हॉल येथे रक्षाबंधन सोहळ्याचे औचित्य साधत राखी बांधण्यासाठी भगिनी आल्या होत्या. यावेळी जनसंपर्क कार्यालयात सपत्नीक त्यांचे स्वागत करून राखी बांधून घेतली. यावेळी सर्व भगिनींना रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा दिल्या.
रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला पवित्र सण. मनगटावर बांधलेल्या गाठींचा संबंध या पवित्र नात्याच्या ऋणानुबंधाशी सुद्धा असतो. राखीची पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ भाऊ-बहिणीच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी बांधली जाते. बहिण भावाच्या आमच्या नात्यातील हा गोडवा असाच कायम राहील.
#रक्षाबंधन #राखी #rakhispecial #rakshabandhanspecial #rakhipornima #राखीपौर्णिमा #rakhicelebration

imageimage