37 ш - перевести

कोणा अजय बोसने माहितीच्या अधिकारात प्रश्न विचारला होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना भेटस्वरूप दिलेल्या हिऱ्याची किंमत किती होती?
त्यावर 'द्विपक्षीय संबंध खराब होतील या कारणाने ही माहिती देऊ शकत नाही,' असे उत्तर केंद्र सरकारने दिले होते.
आता जो बायडेन यांचा कार्यकाळ संपत आला असताना त्यांना अध्यक्षपदावर असताना मिळालेल्या भेटवस्तूंची यादी आणि त्यांची किंमत जाहीर केली आहे. त्यानुसार मोदींनी बायडेन यांना दिलेल्या हिऱ्याची किंमत तब्बल २०,००० डॉलर्स इतकी असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही परदेशी पाहुण्याने अमेरिकेच्या फर्स्ट लेडीला दिलेली ही सर्वात महागडी भेटवस्तू आहे.
सर्वसाधारणपणे आत्तापर्यंत, म्हणजे मोदी पंतप्रधान होईपर्यंत, पूर्वीचे पंतप्रधान परदेशी भेटवस्तू देताना त्यामध्ये भारतीय संस्कृती दिसेल अशा वस्तू, पुस्तकं, हस्तकलेच्या वस्तू इत्यादी वस्तूंची निवड करत असत.
मोदींचे शौकच निराळे आहेत. पूर्वजांनी कमवायचं आणि दिवट्याने उधळायचं असा यांचा प्रकार आहे.

image