4 w - çevirmek

वणी शहराध्यक्षपदी अंकुश बोढे यांची निवड....!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरून आज वणी शहराची कार्यकारणीच्या सर्व पदाच्या नियुक्त्या घोषित करण्यात आल्या. यात शहराध्यक्ष पदाची जबाबदारी शहरातील युवा उद्योजक अंकुश बोढे यांना देण्यात आली. तर त्यांच्या मदतीला शहर उपाध्यक्ष म्हणून मयूर घाटोळे, मयुर गेडाम व विलास चोखारे, शहर सचिव म्हणून शंकर पिंपळकर, संघटक म्हणून अमोल मसेवार यांच्या वर सर्वानुमते या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. आज या सर्व पदाच्या घोषणा करण्यात आल्या असून लवकरच सन्मानीय राजसाहेबांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात येईल.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत राजसाहेबांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी व संघटनात्मक बांधणीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

imageimage