6 w - Tradurre

आदरणीय राजसाहेबांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!
आज गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी, राजकीय क्षेत्रात मला नवी ओळख देणारे माझे मार्गदर्शक, आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याचा योग आला. राजसाहेबांचे विचार, त्यांची दूरदृष्टी आणि त्यांचे मार्गदर्शन हे माझ्यासाठी नेहमीच प्रेरणास्थान राहिले आहे.
त्यांच्या सान्निध्यात मिळालेले धडे आणि त्यांचे आशीर्वाद हे माझ्या आयुष्याची सर्वात मोठी पूंजी आहे. त्यांनी केवळ राजकीय मार्गच दाखवला नाही, तर एक सच्चा कार्यकर्ता कसा असावा हे देखील शिकवले. त्यांच्या प्रत्येक शब्दातून आणि कृतीतून मिळणारी ऊर्जा ही माझ्या वाटचालीस नेहमीच बळ देत राहील.
आज त्यांच्या चरणी नतमस्तक होताना, कृतज्ञतेने मन भरून आले. त्यांचे हे आशीर्वाद असेच कायम माझ्या पाठीशी राहोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...

imageimage