1 C - Traduzir

शहराध्यक्षाचा 'ढोरकी' अवतार, पालिकेची बोलती बंद..
वणी शहरात मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त असताना, नगर परिषदेचे दुर्लक्ष पाहून पक्षाकडून प्रशासनाला चांगलाच धडा शिकवला आहे. मनसेचे वणी शहराध्यक्ष माझा सहकारी अंकुश बोढे यांनी 'ढोरकी'चा अनोखा अवतार घेत, शहरातील सर्व मोकाट जनावरांना ढोल-ताशांच्या गजरात थेट नगर परिषदेच्या कार्यालयात नेले.
अनेकदा निवेदने देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला या 'अकल्पित हल्ल्याने' चांगलीच धडकी भरली. अखेर मुख्याधिकाऱ्यांनी बाहेर येऊन ७ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन दिले.
या अतुलनीय आंदोलनाबद्दल अंकुश आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. तुमच्या या धाडसी आणि कल्पक आंदोलनामुळे प्रशासनाला जाग आली आहे. नागरिकांच्या हितासाठी तुम्ही दाखवलेली ही धडाडी निश्चितच कौतुकास्पद आहे.
#mns #rajthackeray #ankushbodhe #wani #मनसे #वणी #राजकारण #जनहित #ढोरकीआंदोलन

image