📍 शासकीय मैदान | वणी
ग्रामीण भागातील माझ्या तरुण खेळाडू मित्रांच्या क्रीडागुणांना हक्काचे मैदान मिळावे, या उद्देशातून आम्ही आयोजित केलेल्या 'दिवस व रात्र कालीन वणी प्रीमियम लीग - मनसे चषक २०२६' (सीजन-३) चा आज वणीच्या शासकीय मैदानावर अत्यंत दिमाखात, आतिषबाजीत आणि उत्साहात प्रारंभ झाला.
या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयभाऊ देरकर यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे विजयराव मुकेवार उपस्थित होते. मनसेच्या वतीने जनहिताच्या कामांसोबतच युवकांच्या शक्तीला विधायक वळण देण्यासाठी आम्ही सातत्याने अशा स्पर्धांचे आयोजन करतो. याही वर्षी लाखो रुपयांच्या बक्षिसांमुळे खेळाडूंमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार संजयभाऊ देरकर यांनी आमच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.
या सोहळ्याला मनसे वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष इरशाद खान, मनसे जिल्हाध्यक्ष (शेतकरी सेना) रमेश पेचे, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर, गोविंदराव थेरे, व्यापारी सेनेचे शहराध्यक्ष राकेश वैद्य, दिलीप मस्के, विलन बोदाडकर, राजु बोदाडकर, अविनाश पाटील, रवि आंबटकर, महेश हातगावकर, संजय गौरकर, मयूर घाटोळे, तसेच आयोजक समितीचे शैलेश ढोके, नदीम शेख आणि वणीतील सर्व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चला तर मग वणीकरांनो, पुढचे काही दिवस शासकीय मैदानावर क्रिकेटचा हा थरार अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. सहभागी सर्व संघांना आणि खेळाडूंना माझ्याकडून विजयाच्या खूप खूप शुभेच्छा..!
#mnschashak2026 #wanipremiumleague #rajuumbarkar #mns #cricketfever #yuvashakti
